प्रत्येक गावाची,शहराची एक स्वतंत्र ओळख असते. सोलापूरचा पाहुणचार अन् सोलापूरची खाद्यसंस्कृती ही स्वतःचं वेगळेपण सांगणारी अशीच आहे. हेरिटेज लॉन्सचे मनोज शहा हेच वेगळेपण जपतात. म्हणूनच सोलापूरला येणारा पाहुणा हेरिटेजचा पाहुणचार घेतल्यावर तृप्त होतो. साहित्यिक असोत, चित्रपट अभिनेते असोत किंवा राष्ट्रीयस्तरावरील नेते मंडळी असोत….सोलापूर भेटीनंतर सोबत घेऊन जातात ती हेरिटेजच्या सोलापुरी आग्रह आणि पाहुणचाराची लज्जत.
निमित्त होतं महा जनयात्रेच्या समारोपानिमित्त सोलापुरात आयोजित जाहिरसभेचे. या जाहिरसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा हे सोलापूर मुक्कामी आले होते.केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या समवेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भुपेंद्र यादव यांच्यासह अनेक मंत्री,पदाधिकारी रविवार दि. १ सप्टेंबर रोजी रात्री सोलापूर विश्रामधामवर मुक्कामी होते. त्यामुळे त्यांच्या जेवणासाठी भाजपातर्फे विश्रामधामवर सोय करण्यात आली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमितजींच्या जेवणातील मेनूची यादी गृहमंत्रालयाकडून मागविण्यात आली होती. त्याप्रमाणे गुजराती पद्धतीचे जेवण बनविण्याची जबाबदारी हेरिटेजचे मनोज शहा आणि अमृता माखीजा यांच्यावर सोपविण्यात आली होती.
रविवारी संध्याकाळचा नाश्ता अन् रात्रीच्या जेवणात गुजराती पदार्थांची रेलचेल होती. नाश्त्याला कचोरी,खमनी, भेळ,ड्रायफ्रुट, ज्युस असा मेन्यू तर जेवणामध्ये ढोकळा, खांडवी, मटर समोसा, रस मलाई, अंजीर हलवा, मुंगला खिचडी, फुलका, पराठा, गुजराती कढी, पनीर मख्खनवाला, उंडीओ, मारवाडी मिक्स व्हेज, शाही काजू ब्रोकोली, सॅलेड, पापड, आईस्क्रीम असा मेन्यू होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कूक सोबत आला होता. मात्र मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अमितजींसोबतच गुजराती जेवण घेणे पसंद केले. तर सोमवारी सकाळी अमितजी यांनी इडली-वडा, सांबर,चटणी सोबत डॉलर जिलेबी, चटणी, बेसन कढी, उपमा, ब्रेड जॅम, ज्युसचा समावेश असलेला नाश्ता घेतला.
सोलापूर मुक्कामातही गुजराती पद्धतीचे कमी तिखट चवीचे पदार्थ खायला मिळाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा खुश झाले. हेरिटेजच्या पाहुणचाराचे कौतुक करीत हेरिटेजचे मनोज शहा आणि अमृता माखीजा यांची आस्थेने विचारपूस करीत तृप्तपणे शाबासकी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो की नाट्य संमेलन, सेलिब्रेटींची भेट असो की राजकीय जाहिरसभा असो सोलापुरी आग्रह आणि पाहुणचारासाठी हेरिटेज लॉन्स हे नेहमीच सज्ज असते. पाहुणा कुठल्याही प्रांताचा असो की देशाचा त्याच्या आवडीचा पदार्थ खिलविण्याचा सोलापुरी आग्रह करावा तर हेरिटेज लॉन्सने….

One reply on “अमितभाई शहा यांना आवडला सोलापुरी पाहुणचार ; हेरिटेजच्या शिरपेचात मानाचा तुरा..!”
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.